भरली काकडी
|१) काकडी पाव किलो
२) शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी
३) तिखट एक चमचा भरून
४) पिठी साखर अर्धा चमचा
५) गोडा मसाला एक चमचा
६) ओलं खोबरं अर्धी वाटी
७) तेल , फोडणीचं साहित्य
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) काकडी स्वच्छ धुवून घ्यावी . तिचे दोन इंचाचे तुकडे करावे व भरण्यासाठी मध्ये दोन छेद दयावेत .
२) सर्व मसाला एकत्र कालवून काकडीत भरावा . एका पातेल्यात मसाला भरलेले सर्व तुकडे ठेवून पाणी न घालता कुकरला तीन शिट्टया कराव्या .
३) भाजी गार झाली की अर्धी पळी तेलाची फोडणी वरून घालावी .