भरली वांगी

bharalivangi1

 

 

साहित्य :-

१)      छोटी वांगी पाव किलो

२)     गोड मसाला तीन चमचे

३)     तिळाचा कूट सात-आठ चमचे

४)     भाजलेल्या खोबऱ्याची पूड सात-आठ चमचे

५)    मध्यम आकाराचे कांदे दोन-तीन

६)      लाल तिखट आवडीप्रमाणे

७)    फोडणीच साहित्य , मेथीचे दाणे पाव चमचा

८)     तेल अर्धी वाटी , अर्धी वाटी कोथिंबीर

९)      लसूण पाकळ्या पाच-सात , आलं पाव इंचापेक्षा कमी .

मसाल्यासाठी :-

१)      कांदे उभे चिरून तेलावर परतून घ्यावे

२)     नंतर आलं , लसूण , कांदा वाटून घ्यावा

३)     या वाटणात तिलकूट , खोबऱ्याचा कूट

४)     मिसळून त्यात चवीपुरत मीठ घालावं

५)    त्यातच भरपूर कोथिंबीरही घालून सारण तयार करावं ,

कृती :-

१)      वांगी धुवून घ्यावीत .  त्याचे देठ काढू नये .  देठ खात नाहीत पण देठासकट भाजी छान दिसते .

२)     वांग्याच्या रुंद गोलाकार भागावर + असा छेद देणे .  या छेदामध्ये वरील मसाला भरावा .

३)     सगळी वांगी भरल्यावर प्रेशर पैन अथवा पसरट भांड्यात अर्धी वाटी तेलाची फोडणी करावी आणि त्यात एक-एक वांगं व्यवस्थित सोडावं .

४)     प्रेशरपैनचं झाकण लावल्यास , पैनचा आवाज आल्याबरोबर गैस बंद करावा .  नाहीतर भाजी जास्त शिजेल .

५)    पसरट भांड्यात वरीलप्रमाणे वांगी ठेवून मंद आचेवर भाजी शिजू द्यावी .  वांगी शिजण्यास वेळ लागत नाही .

६)      वऱ्हाडात काही ठिकाणी हीच भाजी आंबट-गोड करतात .  तेव्हा त्यात चवीपुरता गूळ व चार चमचे चिंचेचा कोळ घालतात .

७)    भाजी भांड्यामध्ये काढल्यावर वरून मेथीचा तडका द्यावा , एकदम खासच  लागते .

८)     ज्वारी अथवा बाजरीचा भाकरीबरोबर आणि तोंडी लावायला कच्च्या कांद्याच्या फोडी असल्यास तबियत एकदम खुश !