भरलेली अंडी
|१) चार उकडलेली अंडी
२) दोन कांदे बारीक चिरलेले
३) एक चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा रस
४) अर्धा चमचा गरम मसाला
५) दोन चमचे ओले खोबरे
६) थोडी कोथिंबीर
७) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) अंडी उकडून घेऊन त्यांची साल काढून त्याला वांग्याला देतो तशा उभ्या बाजूने चिरा दयाव्यात .
२) कांदा तुपावर जरा नरम करून घ्यावा . त्यात ओले खोबरे , मीठ , मसाला टाकून सर्व एकत्र मिश्रण करावे . व तो मसाला अंड्यात भरावा .
३) पसरट पातेल्यात थोडे तूप टाकून त्यावर ही अंडी ठेवावीत व चांगली वाफ काढावी . ही मसालेदार अंडी चविष्ट लागतात .