भाऊ रायला ओवाळीते ताईची माया

rakhi
भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्य साधारण महत्व आहे.प्रत्येक सणाला आपली एक वेगळी अशी ओळख आहे.
मानवीय सभ्यतेला संस्कृतीचा विसर पडू नये आणि माणूस माणसाशी जोडला जावा ह्यासाठी सणाची निर्मिती करण्यात आली आहे.
त्या मधलाच एक आगळा वेगळा परंतु मायेचं आणि प्रेमचं प्रतिक असलेला सण म्हणजे “रक्षाबंधन” म्हणजेच राखी पौर्णिमेचा सण.
बहिणीने भावाला ओवाळून त्याच्या हातात राखी बांधण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन.
त्याच्या बदल्यात भावाने बहिणीची आयुष्यभर राक्षणाची शपथ घ्यायची असते आणि तस वाचन देखील द्यायाचं असतं.
संपुर्ण भरतात रक्षाबंधन अतिशय उत्साहाने साजरा केले जाते.
ह्या दिवशी सासरी असणारी ताई आपल्या लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी माहेरी येते….माहेरचं बालपण,आठवणी जाग्या करते.
मुळात पूर्ण उत्साह आणि औत्सुक्याने रक्षाबंधन साजरी होत असते.