भाजल्यास अशी घ्या काळजी

imagesदिवाळीचा सण जवळ आला आहे. फटके फोडतांना लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता असते. फटके फोडतांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने भाजल्यास काय करावे यासाठी उपयुक्त माहिती खाली देत आहोत,

१)        भाजलेल्या अवयवावर थंड पाणी टाका. व जळालेल्या कातडीवर, भागावर पाण्यात भिजविलेली कापडी पट्टी लावा.

२)      शरीरावर घट्ट बसणार्‍या बांगड्या, अंगठय़ा, पायातील बूट अशा वस्तू शक्य तितक्या लवकर काढून घ्या.
कारण कालांतराने अंगावर सूज येऊ शकते.

३)       डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधा. जंतूसंसर्ग टाळण्यासाठी भाजलेली जखम झाका. भाजलेल्या व्यक्तीला आपली जखम दिसत नसल्याने तो शांत राहतो. डॉक्टर येईपर्यंत भाजलेल्या व्यक्तीला धीर द्या.

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *