भारताचा पराभव ३-१ ने गमावली मालिका

bh
विजयाचे शिलेदार असणारे भारतीय क्रिकेट पटूचा इंगलंड विरुद्धच्या कसोटीत मोठा पराभव झाला आहे.इंगलंड ने मालिका ३-१ ने जिंकली.
लॉर्डसच्या विजयानंतर आत्मविश्‍वास गमावलेल्या भारतीय संघाने
आणखी एका दारुण पराभवाचा सामना केला. पाचवी कसोटी इंग्लडंने १ डाव २४४ धावांनी जिंकत मालिका ३-१ ने खिशात टाकली.
पहिल्या डावात ३३८ धावांनी मागे पडल्यानंतर भारताचा दुसरा डाव अवघ्या २९.२ षटकांत ९४ धावांत संपुष्टात आला. भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. लॉर्डस्‌ कसोटी जिंकून खरेतर आत्मविश्‍वास उंचावलेल्या भारताकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.
मात्र, फलंदाजांच्या आत्मघातकी खेळाने ती साफ फोल ठरली.
त्यामुळे भारतीय संघाचा विश्वास डळमळीत झाला आहे.धोनी ब्रिगेडला आता सरावाची गरज आहे.
कारण देशाला हव आहे तो विजय मग तो कसाही मिळवा.