भारांगीच्या फुलांची भाजी

साहित्य :-bharangi

१)      भारंगीची फुलं दोन वाटया

२)     एक कांदा

३)     मुग डाळ पाव वाटी

४)     तिखट , मीठ

५)    गुळ , खोबरं .

कृती :-

१)      भारंगीची फुलं चिरून दोन-तीन वेळा पाण्यातून पिळून टाकावीत .  म्हणजे त्यांचा कडवटपणा जाईल .

२)     फोडणीत बारीक चिरून कांदा , मुग डाळ टाकून परतावी , त्यावर चिरलेली फुलं टाकावीत .

३)     त्यात मीठ , गुळ , तिखट , खोबरं घालून मंद आचेवर शिजवावी .

४)     फुलं परतून घेऊन भाजणीचं पीठ पेरूनही भाजी चांगली होते .

५)    भाजलेल्या खसखशीची पूड , भाजलेल्या तिळाचा कूट घालूनही उत्तम चव येते .