भावना नेमक्या कशा दुखावतात ????

b
भारतीय लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्या बरोबर सामाजिक संवेदनांना खूप महत्व आहे.कारण जातीयवाद आणि धर्मवाद इथल्या रक्ता-रक्तात मिसळलेला आहे,त्यामुळे कुठल्याही गोष्टीची वाच्यता करत असतांना खबरदारी खूप महत्वाची आहे. आणि आपलं विधान जर जाती धर्मावर आधारित असेल तर जास्तीची काळजी घेणे बंधनकारक आहे.
ज्या देशात नुसत्या अफवांवर दंगली घडतात त्या देशात शहाणपणाचे डोस जरा कडवटचं वाटतात.आता हेच बघा ना जरा काही कुणी वादग्रस्त विधान केलं तर…? लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो,आणि त्यात देवा धर्मावर भाष्य असेल तर जाळपोळ इथे पाचवीला पुजलेली…हा” वादग्रस्त विधाने जर धर्मगुरू किंव्हा धर्माचे ठेकेदार करतील तर त्यांचं समर्थन करायला इथला मिडिया आहेचं,पण जर वक्तव्य राजकीय किव्हा धर्मपटलाच्या बाहेरील व्यक्तीच असेल तर मग भावना ह्या दुखावल्या जातात..!
भारतात भावना कुणाच्या कशा आणि कधी दुखावतील हे सांगण जरा कठीण आहे.आता हेच बघा ना…..शाहीद कपूरच्या कमीने ह्या चित्रपटात “दिल निचोडे” या गाण्यात ‘तेली का तेल’ असा शब्द होता तर तेव्हा असंख्य तेली समाजाने उठाव केला कि आमच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…..मुळात या गाण्यात आक्षेपार्ह असं काहीच नव्हत.त्याचप्रमाणे धोबिघाट,रामलीला,जोधा अकबर,फना असे कितीतरी चित्रपट हे भावना दुखावणारे ठरले,तसेच celebrity चं वक्तव्यही……काही महिन्यांपूर्वी जया बच्चन यांनी मराठीवर वक्तव्य केलं होत तेव्हा मनसेच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आता राम गोपालं वर्माने केलेलं गणपतीवरच वक्तव्य वादग्रस्त ठरलं तर बाळासाहेब ठाकरेंच्या अन्ताविधीप्रसंगी मुंबई बंद बद्दल facebook वरती नोंदविलेला आक्षेप अशा एक ना अनेक घटना आपल्या देशात आणि राज्यात घडल्या आहेत.मुळात काही घटना ह्या वादग्रस्त असतात मात्र काही घटनांचा उगाच ओहापोह केला जातो.
कुणी जरा काही बोलले की भावना दुखावतात,जातीवाचक कुणी बोलले की भावना दुखावतात,बंद पाळला तरी भावना दुखावतात,बंद मोडला तरी भावना दुखावतात,मुळात भारतात भावनेला मर्यादा नाही ती कुठेही कशीही दुखावली जाऊ शकते…..! त्यामुळे आपणही जरा अदबीने वागायला आणि बोलायला शिका नाहीतर तुम्हीही कुणाच्या भावना दुखवण्याचं निम्मित्त ठरालं……..! कारण इथं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पण बोलल्या नंतर स्वातंत्र्य नाही.आता माझ्या ह्या लेखाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आत्तापासूनचं मी माफी मागतो….