भावना

love in eyesमनी उमटल्या अनेक छटा

दडपलेल्या भावनांच्या

कधी धूसर , कधी गर्द

जीवनातील रंगाच्या .

 

नजरेतुनच भाव कळे अंतरीचा

कधी प्रेमाचा कधी क्रोधाचा

झुकती नजरही बरेच काही सांगे

कधी लाजून होकार तर कधी

पश्चाताप अपराधाच्या

 

शब्दही अपुरे पडतात कधी

भावना अंतरीच्या प्रकट करताना

संवाद अपुरा राहून जातो कधी

नजर व शब्दांच्या मेळ घालताना

 

कधी हुर हुर दाटे मनात

कधी आक्रोश उचंबळे

अपार ओढ निर्माण होई

कधी कुढे कसे ना कळे

 

व्यक्तिमत्वाच्या अंग असे या भावना

जीवन खुलवी या भावना

नव्या नात्यांच्या प्रारंभ या भावना

 

 

– किरण अर्जुनसिंग राजपूत