भूतान
|भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे.
भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे.
थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.२००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे.
७५% लोकसंख्या असलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी येथे बहुसंख्यक असून वज्रयान बौद्ध धर्म हा या देशाचा अधिकृत धर्म किंवा राष्ट्रीय धर्म आहे.
भूटान ला गेले की भेट देण्याची ठिकाने
थिंफू व्हॅली. बुद्ध दर्डेनमा पुतळा. पारो व्हॅली. ताकात्संग मठ. रिनपुंग डिजॉन्ग. सोन ला पास. पुनाखा डिजोंग. फॅब्जिखा व्हॅली.
