भेंडीची रस भाजी
|१) भेंडी पाव किलो
२) दोन कांदे उभे चिरून
३) गूळ चिरून एक चमचा
४) लाल तिखट एक चमचा भरून
५) चिंचेचा कोळ चार चमचे
६) कढीलिंबाची आठ-दहा पानं
७) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) भेंडी धुऊन-पुसून , तिरक्या काचऱ्या करून चिरावी . अर्धी पळी तेलाची फोडणी करून त्यात कढीलिंब व कांदा घालून परतून घ्यावं .
२) मग भेंडी घालावी . भेंडीची तार जाईपर्यंत मंद आचेवर भाजी परतावी . मग एक वाटी पाणी घालावं .
३) भेंडी शिजत आली की यात मीठ , गूळ , चिंचेचा कोळ , मसाला व तिखट घालून परत मिनिटं भाजी शिजू दयावी .
४) रस थोडासा ठेवावा . (परतताना या भाजीवर झाकण ठेवू नये .)