भेंडीची सुकी भाजी
|१) अर्धा किलो कोवळी भेंडी
२) दोन मिरच्या
३) दोन-तीन आमसुले
४) दोन टेबल स्पून तेल
५) हिंग , मोहरी
६) हळद , कोथिंबीर
७) चवीला साखर
८) थोडेसे खोबरे
९) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) भेंडी धुवून चांगली पुसून कोरडी करून घ्यावी म्हणजे भाजी बुळबुळीत होत नाही . भेंडयांची देठे काढून त्यांचे लहान लहान तुकडे करावेत .
२) तेलात , हिंग , मोहरीची फोडणी करून भेंडी टाकून परतावे . आमसुलाचे तुकडे टाकावेत . भाजी परतत राहावी .
३) हळद , मीठ , साखर टाकावी . भाजीवर झाकण ठेवू नये . कारण वाफेचे पाणी पडले तर भाजी चिकट होईल .
४) भाजी नरम शिजली की त्यात कोथिंबीर व थोडेसे खोबरे टाकावे .