भेंडी मसाला
|१) भेंडी एक किलो
२) कांदे चार-पाच
३) टोमाटो तीन-चार
४) लसूण पाच-सहा पाकळ्या
५) हिरव्या मिरच्या चार-पाच
६) लाल तिखट एक चमचा
७) धने-जिरेपूड एक चमचा
८) आमचूर एक चमचा
९) कोथिंबीर , तेल
१०) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) भेंडी फार लहान असल्यास अख्खी ठेवावी , नाही तर मोठे दोन-तीन तिरपे तुकडे करून तेलात तळून काढावे .
२) कांदा अडवा पातळ चिरावा . टोमाटोच्या फोडी कराव्या . मिरच्या बारीक चिराव्या . लसणाचे तुकडे करावे .
३) तेल गरम करून त्यात लसूण व मिरच्या परतून त्यावर कांदा घालून गुलाबीसर रंगावर परतावा .
४) नंतर चिरलेला टोमाटो घालावा . मऊ झाल्यावर त्यात तिखट , धने-जिरे पूड घालून पाव कप पाणी घालून शिजवावं .
५) पाणी आटल्यावर त्यात भेंडी घालून परतावी . शेवटी आमचूर , मीठ घालावं . वरून कोथिंबीर पेरावी .