भेट

गाडी थंड हवा
बाहेर झुळुक वारा
तुला पेंग आली की ग्लानी
अलगद खांद्यावर रेललीस
प्रथम बोललीस
सॉरी हा…

तिथेच पटलीस
एकदम हसलीस
म्हणालीस ….
ते झोपेचे नाटक खोटे
मग खरं काय ते बोल ना..

झकास लागलीच
हलकेच पुटपुटली
सगळं सांगायलाच हवे
ओळखता येत नाही मनातलं ….

निरोपाच्या वेळी आग्रह भारी
इथेच उतर …… इथेच उतर …..
उत्तर ऐकून हिरमुसली
नाही जमणार महत्त्वाच्या कामासाठी आहे प्रवास
पुन्हा भेटू लवकरच
आश्वासनावर नाराज लीस
मनात विचार चक्र भयंकर
कोण ग तू कुठची ग तू …

स्मार्टफोन कायम बंद तुझा
तेव्हापासून शोध सुरू आहे माझा….
पत्ता माहीत नसलेल्या अपूर्ण प्रेमाचा
शोध प्रिय बेपत्ता प्रियतमेचा….

कवी . चंद्रकांत गोविंद चांदे उर्फ पवार