भोग

bhogaभोग नाही सरले देवा जोग पाहिला मागुन

राग आला जीनागाणीचा राग पहिला गावून

बघ आली कारे विठू तुझ्या पंढरीला जाग

रात उभ्या जलमाची मीही पाहिला जाळून

 

जळणाऱ्या सरणाला मरणाची गरज होती

तरणारी गाया तुळ्याची खर तेच बोलती होती

त्यांनी झाकल्या मुठी तेहतीस कोटी आमच्या

पुढ्यात ठेवून …

नाही समोर आला पाने तुझ्या प्रमाणाची रोज

पहिली चाणून बघा आली कारे …

 

उधळलेल्या जिवांचा भंडारा तुझ्या दरबारी

मावेना पिवळा पितांबर झालो

तुझ्या भटांना आणि मठांना तोही पुरेना

निती सांगण्याची निती जरा पाहिली जवळून

भक्तीच्या नावाखाली त्यांनी भक्तीच दिली मांडून

बघ आली कारे …

 

टाकून दे श्वास आज बाद झाली दुनिया

दाबून तुझा आवाज आबाद झाली दुनिया

लक्तरेच रस्त्यावरती विखुरलेली सर्वत्र

लुटून सगळा साज फरार झाली दुनिया

वितळला जीव माझा पणतीला लटकून

बात नाही पेटली तुझ्या गाभाऱ्यातून

बघ आली कारे …

– खैरनार हुकूमचंद संजय