मटारची आमटी

साहित्य :-matar123

१)      एक वाटी सोललेले मटारचे दाणे

२)     एक वाटी बटाटयाच्या बारीक चिरलेल्या फोडी

३)     अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमाटो

४)     कढीलिंबाची दहा-बारा पानं बारीक चिरून

५)    चिमुटभर लवंग-दालचिनी पूड

६)      अर्धा चमचा धने-जिरं पूड

७)    लाल तिखट , हळद

८)     चिंचेचा कोळ , गूळ

९)      फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल

१०)  मोहरी , हिंग

११)   चिमुटभर मेथी पूड

१२)  ओलं खोबरं , कोथिंबीर

१३)  चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      मटार वाफवून घ्यावे .  तेलाची फोडणी करून त्यात मेथी पूड , कढीलिंब , बटाटे घालून परतून घ्यावे . 

२)     टोमाटो घालून परतावं .  त्यात मटारचे दाणे , दोन वाटया पाणी , मीठ , लाल तिखट , गूळ , चिंचेचा कोळ आणि मसाला घालून उकळू दया .  खोबरं-कोथिंबीर घालावी .  (यात कुठलीही डाळ नसली तरी आमटी चांगली लागते .)

 

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *