मटार आणि वांग्याचं भरीत
|१) मोठं भारताचं वंगं एक
२) हिरव्या मिरच्या चार-पाच
३) कोवळे मटार दाणे एक वाटी
४) फोडणीसाठी तेल
५) मोहरी , जिरं
६) हिंग , हळद
७) कांदे दोन , कोथिंबीर
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) वांग्याला तेलाचा हात लावून ते सगळीकडं नीट भाजून घ्यावं . नंतर थोडावेळ पातेल्याखाली झाकावं म्हणजे सालं पटकन निघतात .
२) सालं काढून मऊ कुस्करून घ्यावं . तेलात जिरं-मोहरी , हिंग , हळदीची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा , मिरचीचे तुकडे , अर्धवट ठेचलेले मटार दाणे घालून परतावं .
३) वाफ आणून मीठ व वांगं घालून पुन्हा परतावं . वरून कोथिंबीर घालावी . गरम भाकरीबरोबर वाढावं .