मटार कटलेट
|१) दीड वाटी मटार दाणे
२) तीन मध्यम बटाटे
३) एक छोटा कांदा
४) अर्धी वाटी बारीक रवा
५) सहा-सात हिरव्या मिरच्या
६) आल्याचा तुकडा
७) पाच-सहा लसूण पाकळ्या
८) थोडी कोथिंबीर
९) दोन चमचे कॉर्नफ्लॉवर
१०) अर्धा लिंबाचा रस
११) पाव चमचा हळद
१२) चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर
१३) पाव वाटी तेल
१४) एक चमचा पांढरे तीळ .
कृती :-
१) बटाटे उकडून घ्यावे . आलं-लसूण , मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं . तीळ भाजून घ्यावे . कांदा बारीक चिरावा .
२) थोडया तेलावर मटारचे दाणे परतून घ्यावे . नंतर त्याच्यात हळद , मीठ घालून एक वाफ आणावी .
३) गार झाल्यावर वाटीनं रगडून अर्धवट बारीक करावे . त्याच्यात उकडलेला बटाटा कुस्करून घालावा .
४) तेल , रव्याव्यतिरिक्त सगळं साहित्य घालावं . ते चांगलं मळून त्याचे लांबट गोल किंवा चप्पट कटलेट करावं .
५) रव्यात घोळवून नंतर नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल टाकून तांबूस भाजावं . खमंग कटलेट तयार ! चिंचेच्या आंबटगोड चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर गरमागरम वाढावं . (नॉनस्टिकवर केल्यामुळं कमी तेलात तयार होतात . तळल्यावर खूप तेलकट होतात .)