मटार पुलाव

साहित्य :-matar pulov

१)      अर्धा किलो हिरवे वाटाणे

२)     तीन कांदे , चार टोमाटो

३)     दोन वाटया बासमती तांदूळ

४)     चार वाटया गरम पाणी

५)    तीन टेबल स्पून तेल

६)      दोन हिरव्या मिरच्या

७)    एक टेबल स्पून आले-लसूण पेस्ट

८)     पाव चमचा हळद , अर्धा चमचा तिखट

९)      पाऊण चमचा गरम मसाला पावडर

१०)  चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      तांदूळ धुवून अर्धा तास भिजत ठेवावे .  कढाईत तूप तापले की मिरचीचे तुकडे टाकून कांदा टाकून परतावे . 

२)     कांदा जरा नरम झाला की वाटाणे टाकावे .  टोमाटो टाकून परतावे .  आले-लसूण पेस्ट टाकून जरासे परतावे . 

३)     तांदूळ टाकून हळद, तिखट मसाला , मीठ टाकून थोडा वेळ परतून गरम पाणी टाकून ढवळावे , मंद आचेवर शिजवावे . 

४)     तांदळाप्रमाणे पाणी कमी किंवा जास्त टाकावे .  भात मोकळा झाला पाहिजे . 

५)    आधी थोडे पाणी कमी टाकावे म्हणजे पाणी आणखी लागले तर थोडे पाणी टाकून वाफ काढता येते .  तुपाऐवजी तेल वापरले तरी चालते . 

६)      भातावर खोबरे व कोथिंबीर टाकावी .  कुकरमध्ये एका शिट्टीत भात होतो .  भाज्यांसाठी , भातासाठी लहान कुकर सोयीस्कर असतो .