मतदान करावं तरी कुणाला ?

netaदेशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत,आश्वासनांचा पाऊस पडतो आहे.

गरीब लोकशाही,भुकेली जनता,हवालदिल झालेला शेतकरी सर्वच आता आशेचा दीप पेटवत आहेत.

कि आता तरी दिवस बदलणार,!लोकशाही मजबूत बनणार ,सक्षम भारताच बिलोरी स्वप्न साकार होणार …

पण ह्या भाभड्या आशा कितपत पूर्ण होतील हे तर आता निकालानंतरच कळेल.
मात्र आश्वासनाचा का असेना दिलासा जनता अनुभवत आहे हे नाकारून चालणार नाही.
प्रत्येक राजकीय पक्षाने ताकदीचा आणि सक्षम (आर्थिकदृष्ट्या ) उमेदवार रिंगणात उभा केला आहे.
त्यामुळे यंदाची हि देशातील सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणुक कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे,खेडोपाड्यात तर गाड्यांचा ताफा चौफेर फिरतांना दिसतो.
सफेद कपड्यातील कार्यकर्ते आणि खादी वेशातील पुढारी जोरात भेटीगाठी घेतांना दिसत आहेत  ज़नतेच्या समस्या जाणून घेतांना दिसत आहेत.
गावागावात मटणाच्या खानावळी उठविल्या जात आहेत,शहराशहरात हॉटेल्स कार्यकर्त्यांनी तुडुंब भरल्या आहेत.
त्यामुळे उन्हाळ्यात पण गारव्याची लाट अनुभवायला मिळत आहे.
पण सर्वत्र अफवांचे वारे फिरत आहेत,बंडखोरी,फोडाफोडी दिवसागणिक चालूच आहेत.
मात्र देशाचं भवितव्य हातात असणारे मतदाते बिचारे संभ्रमात पडले आहेत की मतदान करावं तरी कुणाला ?