मतदार राजा जागा हो ….!

imagesदेशभरात होऊ घातलेल्या १६ व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची लगबग आणि प्रचाराची

धावपळ सर्वच राजकीय पक्षांमार्फत होतांना दिसतं आहे. त्यात अपक्ष उमेदवारांची लगबगही पाहण्यासारखी आहे. प्रचारासाठी  नवनवीन तंत्र वापरली जात आहेत,अगदी celebrity सुद्धा निवडणूक लाडवित्ताना आणि प्रचारासाठी road shows करतांना दिसत आहेत. प्रत्येक पक्षाचा विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध होत आहे, मात्र तो कितपत खरा ठरतो हे तर निवडणुकींचा निकाल लागल्यानंतरच कळेल .
मात्र लोकशाहीचा आत्मा समजला  जाणारा मतदार राजा नेमकं कुणाला मत देतो किव्हा नकाराधिकार वापरतो हे फार महत्वाच आहे.
निवडणुकीचा दिवस हा सुट्टी सारखा एन्जॉय करणारी पण बरीच शिक्षित मंडळी आहे. शिवाय ग्रामीण भागामध्ये मतदाना संधर्भात असलेली उदासीनता,शहरी भागात उमेदवार संधर्भात असलेली उदासीनता सर्वत्रच पाहायला मिळते अशा परीस्थित नेमका कुठला निर्णय घ्यायचा असा प्रश्न बहुदा मतदाराला पडलेला असतो.
लक्षात घ्या तुमचं एक मत देशाचं भवितव्य घडवु शकत इतकं ते महत्वाच आहे त्यामुळे मतदान हे केलंच जायला हवं .
जर एकही उमेदवार तुम्हाला योग्य वाटत नसेल तर “ह्या पैकी कुणीच नाही “असा पर्याय वोटिंग मशीनवर उपलब्ध आहे त्याचा वापर मतदार करू शकतो.
त्यामुळे लोकशाहीच्या भक्कम पायाभरणीसाठी आपल बहुमुल्य मतदानाचा हक्क आपण बजावलाच पाहिजे.. त्यासाठी मतदान जागृती व्हायला हवी