मधयमवर्ग

coman man
सध्या युग हे खूप धावपळीच तसेच स्पर्धेच झालेलं आहे .
आपल्याय ह्या आधुनिकतेत जर टिकायचं असेल तर सारखं पळत रहाव लागत,
तरचं आपला निभाव लागेल नाहीतर,जग आपल्याला दूर लोटून पुढे निघून जाईल.
“आधुनिकता”हा शब्द हल्ली प्रत्येका कडून ऐकावयास मिळतो.
जगाशी fight करतांना स्वताला नेहमी update ठेवावं लागत,वाढती महागाई,वारेमाप खर्च,आणि त्यात मोजकाच पगार असला कि मग घर कस चालवायचं हा मोठा प्रश्न हल्ली प्रत्येकाला सतावत असतो.
त्यातच वारंवार होणारे संप,सामाजिक अशांतता,मन मारून जगायला भाग पाडत असते,
मग अशा परीस्थित नेमकं काय करावं ?हा प्रश्न मध्यमवर्गीयांना  पडलेला असतो.
त्यामुळे मानसिक रोग्यांच प्रमाण  वाढत जात.
घरात खाणारी तोंड जास्त आणि कमविणारी मानस कमी असली कि त्या घरात कलह,कटकट वाढत जाते.
महिनाभर घर भागवण्यासाठी किती तडजोडी कराव्या लागतात,
अगदी एक रुपयाच्या कोथिंबीर साठी तोलमोल करणारी गृहिणी,बचतीचे महत्व सांगणारी म्हातारी मानस तेव्हा योग्य वाटू लागतात.
बायको पोरांनी जर बाहेर फिरायला जाण्याचा साधा जरी हट्ट धरला तरी खिसा चार चार वेळा चाचपडावा लागतो.
कारण चलन मोजकं असतं, जे फक्त जगण्यासाठीचा संघर्ष पूर्ण करत असत,बाकी स्वप्नांना इथे थारा नसतो.
One Comment