मध किती गुणकारक ..?

honeyमधाचा वापर आपल्या घरगुती वापरात होत असतो.आपणास कदाचित माहित नसेल मधाला आयुर्वेदामध्ये विविध आजारांवर रामबाण औषधी मानले गेले आहे. यामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज इत्यादी शर्करांचे मिश्रण आहे. मधामध्ये ७५ टक्के शर्करा असते. या व्यतिरिक्त प्रोटीन, एंजाइम अमीनो अँसिड, पराग, केशर, आयोडीन आणि लोह, तांब, सोडियम, कॅल्शियम, क्लोरीन इत्यादी पोषक तत्त्वे असतात. जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.
1.मधामध्ये जास्त प्रमाणात ए, बी-१, बी-२, बी-३, बी-५, बी-१२ आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. मधाचे फायदे खूप असतात, पण हे असे फायदे आहे ज्याबद्दल तुम्हाला कल्पना नसते.
2.तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल आणि तुमच्या चेहर्‍यावर पुरळ असेल तर थोडासा मध चेहर्‍यावर लावा व अर्धा तास ठेवा त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या व फरक बघा.
3.कफाची समस्या असल्यास एक चमचा मधामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि थोडेसे खोबरेल तेल मिसळून घेतल्यास आराम मिळतो.
4.दोन थेंब हातावर घेऊन त्यामध्ये तेवढेच कोमट पाणी घ्या. या मिश्रणाने चेहर्‍यावर हलक्या हाताने मालिश करा व त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा उजळून येतो.
5.थकवा जाणवत असेल तर एक चमचा मध खा. तुमच्या शरीरात उत्साह व एनर्जी जाणवेल.
6.वयानुसार दररोज १ ते २ चमचा मध व पाणी एकत्र करून पिण्याने अंगकाठी सतेज होते.
तर बघा हे उपाय घरी करून ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी मदत मिळेल. त्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहील.