मराठी चित्रपटांची नांदी

m
महाराष्ट्रात bollywood ची नगरी मुंबईत जरी स्थाईक असली तरी मराठी कलाकार तसेच मराठी चित्रपटांना खूप संघर्ष करावा लागला आहे.मुळात आमची मुंबई असं म्हणणारा मराठी माणूस चित्रपट विश्वातल्या सर्वात मोठ्या निर्मिती क्षेत्रातला रहिवासी असून देखील चित्रपट क्षेत्रात किव्हा मालिकांमध्ये खास करून, हिंदी भाषेतल्या चित्रपटात किव्हा मालिकांमध्ये मराठी टक्का खूप कमी बघायला मिळतो.मुळात चलचित्रपटाची मुहूर्तमेढ रोवणारा मराठी माणूसचं होता.तरी देखील मराठी कलाकारांना आणि चित्रपटांना आपल्या दमाने आपलं वेगळ पण राखावं लागलं आहे.मात्र भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये हल्ली मराठी चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टीकोन अतिशय सकारात्मक झालेला दिसून येतो.कारण मराठी चित्रपट हे आशयघन आणि वैचारिक पातळीवर बनविलेले असतात.त्यामुळे मराठीचं वेगळेपण टिकून आहे.९० च्या दशकात मराठी चित्रपट जरा भरकटलेले वाटत होते,तेच तेच विनोदी आणि सासू सुनेच्या आशयामध्ये मराठी चित्रपट अडकलेले होते. त्यामुळे रसिकांनीही जराशी पाठ दाखवल्या मुळे मराठी चित्रपट क्षेत्रात बदल हवा होता,आणि तो झालाही.आत्ताचे सिनेमे हे ग्रामीण तसेच वास्तववादी चित्र रेखाटणारे आहेत.तसेच तावून सलाखून निघालेले कसदार कलाकारांची कसदार भूमिका चित्रपटांना प्रभावी बनविण्यात मदत करतात .त्यामुळे हल्ली हिंदी सीनेस्टार देखील मराठीत काम करण्याची तयारी दर्शवतात हा सर्वात मोठा बदल मराठी क्षेत्रात झालेला दिसतो.नटरंग,देऊळ,बालक-पालक,तुकाराम,दुनियादारी,टाईमपास,लई भारी ह्यांसारख्या सिनेमांनी तर प्रेक्षकांना मजबूर केलं मराठी चित्रपट पाहायला.त्यामुळे मराठी चित्रपट क्षेत्र आता कमालीच झालं आहे,म्हणून मराठी चित्रपटांची नांदी एकूणच सर्वत्र पाहायला मिळते आहे.