महाराष्ट्र देशा

 

1may
१ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.
अखंड इतिहासाची साक्ष देणाऱ्या आणि वारसा जपणाऱ्या महान अश्या राष्ट्राला म्हणजे आपल्या महाराष्ट्राला स्वतंत्र अशी ओळख प्राप्त झाली,
आणी आजपर्यंत ती ओळख टिकून आहे.
१०५ हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्र मुंबई सह व्हावा ह्यासाठी आपलं आयुष्य पणाला लाऊन एक क्रांतिकारी परिवर्तनवादी विचारांची चळवळ उभी केली.
प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या लेखणीने सबंध महाराष्ट्र पेटून उठला आणि आपल्या अस्मितेची मागणी करू लागला,
इतर राज्यांना फक्त भूगोल आहे पण महाराष्ट्राल भुगोला बरोबर दैदिप्यमान इतिहासाची जोड आहे.
थोर महात्म्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही माती आहे.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मराठ्यांचा इतिहास आजही घुमजाव करतो,छत्रपती शिव-शम्भूंचा हा महाराष्ट्र आहे,
तुकोबांच्या गाथेचा सार जगाला अभ्यासाला देणारा हा महाराष्ट्र आहे ,बाबासाहेब आंबेडकर ,क्रांतीबा ज्योतिबा फुले
यांसारख्या पुरोगामी विचारवंतांचा हा महाराष्ट्र आज ५४ वर्षाची यशस्वी वाटचाल करीत आहे.
राजकारण ,समाजकारण,शिक्षण,उद्योग,कृषी ह्यांसारख्या विविध क्षेत्रात महाराष्ट्र सदाही अग्रगण्य आहे.
म्हणुन या महाराष्ट्रदिनी गर्जना होऊ दया आपल्या अस्मितेची।!
जय महाराष्ट्र ……!