माझा बाप

Fathers-dayबाप कष्टतो राबतो

बाप धुपतो खपतो

बाप कर्तव्याची माळ

क्षणाक्षणाला जपतो ||१||

 

माय चान्द्रच्यापारीस

बाप सूर्यापरी असें

मायेलाही चालायला

बाप उजेड देतसे ||२||

 

बाप आईच्यासारखा

नाही बोलत मोकळ

बाप मनान थोडाही

मात्र नसतो पोकळ ||३||

 

बाप पहाडासारखा

स्थित प्रद्न अविचल

बाप हिटलापारी

मनी नसतोच खल ||४||

 

बाप मारता गोदतो

मनी संस्काराची फुले

बाप वाटे जगाच्याही

पुढे जावी त्याची मुले ||५||

 

बाप कसाही असू दया

बाप पाठीशी असावा

त्याचा अस्तित्व दरारा

साऱ्या जगाशी ठसावा ||६||

 

बाप नसताना होय

मायेचीही होरपळ

असो पडून घरात

तोच देतो तिला बळ ||७||

 

बापाच्याही काळजात

असे जिव्हाळ्याची गाय

न्यावा ज्ञानेश्वरी पान्हा

झाला ज्ञानेश्वर माय ||८||

 

माय कुरवाळीतराही

बाप दुरून पाहतो

त्याचा असावाच पूर

फक्त एकांती वाहतो ||९||

 

बापा म्हणो कुणी काय

दादा,बाबा,पप्पा ,दडी

त्याची संततीच्या साठी

माया असतो हो वेडी ||१०||

 

बापाच्याच चष्म्यातून

बाप वाचवा वाचवा

बाप जन्म निभावण्या

बाप मनात साचावा ||११||

 

बाप समजण्यासाठी

बाप लागते हो व्हावे

दुख बापाच्या गावाचे

असे बापालाच ठाव ||१२||

 

किवितेतला एक एक शब्द म्हणजे

प्रकाशाचे दिवे असतात

माणसाच्या जगण्याला उजळून टाकण्याचे

सामर्थ्य कवितेत असते .

कविता जगण्यावर प्रकाश तर टाकतेच

पण ,

त्यापलीकडचे काहीतरी सांगू पाहते .

 

-कल्याणी मनोज धामणे