माझा महाराष्ट्र

mh1
सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातून घोड्यांच्या टापांचा येणारा टप-टप आवाज आणि त्या टापांच्या स्पर्शाने उडणारी धूळ ज्यांच्या शौर्याची गाठ सांगते,असे महाराष्ट्राचे कुलभूषण छ.शिवाजी महाराज.काळ्या छातीवर अभिमानाची लेणी कोरणारे मावळ्यांचे बछडे,विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा म्हणणाऱ्या संतांची संत भूमी.आणि आम्ही अस्पृश्य म्हणून जन्माला आलो असलो तरी,अस्पृश्य म्हणून मारणार नाहीत अशी सिंह गर्जना करणारे भारतरत्न dr.बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्व महापुरुषांना प्रथमता अभिवादन करतो.आणि मी ……………………आपल्या वक्तव्याला सुरुवात करतो.
श्रोतेहो नमस्कार, मराठवाडा,असो विदर्भ कोकनची माती.खानदेश हा मावळप्रांती मनी झुले कांती
१मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ह्यासाठी १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाच बलिदान दिल,आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.आणि विकासाच्या नव्या प्रवाहाला सुरवात झाली.मुंबई सिनेसृष्टीच माहेरघर तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारूपास आली,नांदेड पवित्र शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं,पुण्याला ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभला तसेच शिक्षनाच माहेरघर म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली.नाशिक कुंभमेळ्याच धार्मिक ठिकाण,व औरंगाबादला किल्ल्यांच्या जिल्हा म्हणून ओळख प्राप्त झाली,आणि कोकणातले हापूस जगभर फिरू लागले.बहिणाबाईच्या ओव्या गाऊन खानदेशची माती हसली,आणि या महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसली.आणि दिल्लीचं तख्त राखणारा आमचा महाराष्ट्र तख्ताचा स्वामी बनला.पुण्यातील विजय भाटकरांनी परम सुपर कॉम्पुटर बनविला आणि सुतळीचा तोडाही न बनवू शकणारा आमचा महाराष्ट्र क्षेपणास्त्र सोडा चांद्रयान सोडा थेट मंगळावर जाऊन पोचला.वि.वा शिरवाडकर,विंदा करंदीकर,वि.सं.खांडेकर ह्या दिग्गज साहितीकांना ज्ञान पीठ पुरस्कार मिळाला,आणि या महाराष्ट्राचा कांदा जगाच्या बाजार पेठेत जाऊन पोचला.आणि IT technologit महाराष्ट्र अग्रेसर झाला.
शिवराय फूले,शाहू,आंबेडकरी विचारांची पिढी ह्या महाराष्ट्राच्या मातीने अनुभवली.देशाला राज्यघटना marathi माणसाने दिली,देशाला चित्रपटाची देणगी मराठी माणसाने दिली,क्रिकेटचा देव marathi माणूस झाला,स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार marathi माणसाने दिला.ज्यांच चरित्र विश्वाने अंगिकारले असे शिवबा महाराष्ट्राने दिले,ज्यांच्या एका एका अभंगावर पीएचडी चे मोठ मोठाले प्रबंध लिहिले जातात असे तुकोबा महाराष्ट्राने दिले.हे विश्वची माझे घर असे सांगून जगाला शांतीचा संदेश देणारे ज्ञानोबा या महाराष्ट्राने दिले,शिक्षणाची गंगा तळागाळात पोचविणारे ज्योतोबा ह्याच महाराष्ट्राने दिले.किती सांगू महती मी माझ्या महाराष्ट्राची खरोखरच माझ्या महाराष्ट्रच वर्णन अतुलनीय आहे,सह्याद्री,सातपुड्याच्या पर्वत रांगा आजही आमच्या पूर्वजांच्या शौर्याच्या इतीहास ताठ मानेन सांगतांना दिसतात.गोधा,कृष्ण,कावेरीच्या तीर्थात आमच्या भूगोलाच निर्माल्य तरंगताना दिसते.परंपरा संस्कृतीचा अमूल्य खजाना ह्याच महाराष्ट्राच्या मातीत पाहायला मिळतो.म्हणून गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा.