माझी माय

Motherतुटलेली माय माझ्या जीवनात आली

मले शिकारे म्हणाली …………………..||धृ||

 

जन्म घेता तुझ्या पोटी

नवता तुले ग आधार

तेरी माझ्यासाठी तून

केला घराचा घ त्याग

माझी माय ,माय ,माझी माय …………………….

 

जीव वाचाविन्या माया

किती सोसल्या तू कळा

दुष्ट सासरच्यांनी तुला

किती दिल्या ग यातना

हो अशी तुटलेली माय माझ्या जीवनात आली ||१||

 

माया मायेची ग माय

तिन दिला ग आसरा

शेतातला सारा मक्ता

लावला तो शिक्षणाला

माझी माय,मायेची माय,माझी माय ……………………….

 

तुझ्या उपकाराची फेड

नाही त्याला कुठे ग तोड

देव दिसतो तरी कसा

नक्कीच माया आजी जसा

हो अशी तुटलेली माय माझ्या जीवनात आली ||२||

 

राबुनी ग शेतात

केली अफार मेहनत

घास भारवूनी तुपासी

तू निजली ग उपासी

हो माझी माय,मोठी माय,माझी माय …………………..

 

माझ सार दुख तून

हसहासात झेललं

तुझ्या मायेच्या पदरात

तून माल ग निजवल

हो अशी तुटलेली माय माझ्या जीवनात आली ||३||

 

-आशिष कांबळे