माझी माय
|माझ्या मायेपुढ फीक
समद देऊळ राऊळ
मायेच्या पायाच्या चिरयात
माझ अजंठा वेरूळ
आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ह्याचा सुरेख मेळ म्हणजे आई,विश्वनिर्मात्याने प्रेम आणि वात्सल्य हयाच प्रतीक म्हणुन आई ह्या अमुल्य दौलतीची निर्मिती केली असेल,असं आई संधर्भात म्हटल जात…………….
आई म्हणोन कोणी आईस हाक मारी,ह्यांसारख्या अनेक आई वरच्या कविता आजवर झाल्या आहेत,होताहेत मात्र आईची प्रतिमा आणी माया शब्दात मावुच शकत नाही.
घरात जर पाच व्यक्ती असले आणि खायला जर एकच भाकरी असली तर त्या घरात एकच व्यक्ती उपाशी असते ती म्हणजे आई.
बाप म्हणतो दिव्याची वात लहान कर मला झोपायचं आहे,आणि पोरगा म्हणतो दिव्याची वात मोठी कर मला अभ्यास करायचा आहे,रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहते आणि त्यांच्या सुखासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र दिव्यासारखी जळत राहते ती आई .
आपले मुलं,परिवार,नाती-गोती अशा असंख्य जबाबदाऱ्या आई अगदी सहज पणे पार पाडत असते.
तसं आई बद्दल बोलावं असं खूप काही आहे.
तरी देखील आजच्या ह्या मातृदिनी आईच्या आईपणाला सलाम….!