माठाचा रव

math

(लाल माठाचे अगदी कोवळे कोंब रुजून येतात , त्याला कोकणात ‘रवाची भाजी’ असं म्हणतात .  अशीच मेथीचीही एक-दोन पानं फुटलेली भाजी असते .  त्याल ‘मेथीचा रव’ असं म्हणतात .  लाल माठाप्रमाणेच मेथीच्या रवाची भाजी करतात .  रव उपटताना मूळ काढू नयेत .  भाजी करताना रव उपटून स्वच्छ धुवून घ्यावा .  देठासकट चिरावा .)

साहित्य :-

१)      माठाचा चिरलेला रव दन वाटया

२)     तुरीची डाळ एक लहान वाटी

३)     हिरव्या मिरच्या एक-दोन

४)     लसूण पाकळ्या चार-पाच

५)    आमसूल एक

६)      गुळ चवीला

७)    तेल , फोडणीचं साहित्य .

कृती :-

१)      तुरीची डाळ चांगली शिजवून घ्यावी .  त्यात मीठ , हळद , पाणी घालून चांगली घोटावी .

२)     तेलात मोहरी , मिरच्यांचे तुकडे , लसूण पाकळ्या टाकून तळाव्यात .

३)     त्यावर चिरलेला रव टाकून परतावा .  एक-दोन वाफा आल्यावर त्यावर घोटलेली डाळ ओतावी .

४)     चवीला गुळ व आमसूल टाकून उकळी आणावी .  ही भाजी पळीवाढी असते .