माठाची परतून भाजी
|साहित्य :-
१) माठ एक जुडी
२) कांदे दोन , सुक्या मिरच्या एक-दोन
३) ओलं खोबरं पाव वाटी
४) गुळ , तेल
५) फोडणीचं साहित्य .
कृती :-
१) चिरलेले कांदे फोडणीत तांबूस होईपर्यंत परतावेत . त्यात स्वच्छ धुवून चिरलेला माठ टाकावा .
२) सुक्या वा ओल्या मिरच्यांचे तुकडे फोडणीतच टाकावेत . भाजी परतून अर्धवट शिजल्यावर चवीनुसार गुळ , मीठ घालावं .
३) भाजीला थोडं पाणी सुटेल . तरीही कोरडीच वाटल्यास एखादा पाण्याचा हबका मारावा .
४) शिजत आल्यावर ओलं खोबरं , कोथिंबीर घालावी .