माणस मातली स्वातंत्र्याने….!

mans

१५ ऑगष्ट.१९४७ साली स्वातंत्र्याचा सूर्य उजाडला,पारतंत्र्यात खितपत पडलेली भारतीय जनता मोकळा श्वास घेण्यास सज्ज झाली.

अनेक दशकापासून लादलेलं पारतंत्र्य आता कायमचंच संपल होत.

आता फक्त स्वराज्य आणि लोकशासन पायाभूत करायचं होत,आणि ते झालंही….

,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला मान्यता मिळाली आणि जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आणि लोकशाही भारतात उदयास आली,प्रगती आणि प्रसिद्धीच्या झोतात भारतीय झगमगु लागले.भाषावार प्रांतरचनेमुळे आणि विविध अलौकिक संस्कृतीने भारताची एक वेगळी ओळख निर्माण झाली.

काळ बदलला तशी मानसं बदलली,आधुनिक प्रगती आणि विकास प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन पोचला.आणि जगाशी स्पर्धा करणारा भारत आज महासत्ता होण्याचे स्वप्न बघू लागला…..

मात्र ह्या मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत काहींच्या लेखी वेगळीच होती……

अभिव्यक्ती “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे” हे आधीच बाबासाहेबांनी नमूद केल होत त्याची मात्र भारतीयांना विस्मृती झाली,त्यामुळे समाजामध्ये आणि देशामध्ये एक नवीनच अराजकता निर्माण झाली,सत्तेच्या लालसेने मानस लबाड झाली,जातीपातीत वाटली गेली,महापुरुषांची बदनामी दिवसेंदिवस वाढू लागली,दहशतवाद,प्रांतवाद,साम्प्रत्वाद,भ्रष्टाचार बोकाळला.आणि बघता बघता इथली मानस स्वातंत्र्याचा माज करू लागली.

आपल्याला कुणाचाच अंकुश नाही म्हणून बेताल वटवटी करू लागली,कायदा आणि सुव्यवस्था ह्यांचा कुणालाच धाक राहिला नाही.मनमर्जीने जो तो जगतोय……………

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे” हि वाक्यच मुळी  नामशेष झाली आहेत.आता फक्त मी माझ्यासाठी,एवढीच संकल्पना ह्या भारतात राबवली जात आहे .

अश्या परिस्थितीत महापुरुषांनी पाहिलेली स्वप्ने साकार झाली आहेत का?हा प्रश्न आपल्या प्रतेकासमोर पडल्या शिवाय राहणार नाही.