माणुसकी

marathi kकोण माने माणुसकीला,कुरनीती हा शिष्टाचार,

भ्रष्टाचार हित इमानदारी,असे कधी ना सुविचार,

इथे विंचवाला सरड्याची चाल आहे.

इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे.

 

इथे रावणाची मैत्री असे सीतेशी

इथे भ्रष्ट्राचारी शपत घेतो गीतेचे

इथे अर्जुनला दुर्योधनाची ढाल आहे.

इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे.

 

इथे द्रोपादीची साडी गहाण आहे.

इथे दुषासन साऱ्यात महान आहे.

इथे बिनविषारी भिंतीवरील पाल आहे.

इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे.

 

इथे ऐक्य माझे उधार राजकारणी

इथे अस्मितेची आहे प्रांतवादी गाणी

कृष्ण कुठे गेला ,एकच सवाल आहे

इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे.

 

इथे बंधुप्रेम,भागीनिप्रेम दिसेना.

इथे मातृत्वाचा दिव लेख असेना.

इथे अश्रुचाही रंग आज लाल आहे

इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे.

 

इथे विस्तवाला पाण्याची साथ आहे.

शेतकरी मिटविण्या कुणाचा हाथ आहे.

इथे शहाण्याची चाणक्यरुपी चाल आहे.

इथे माणुसकीचे हाल बेहाल आहे.

– नरेंद्र व्ही लोणकर.