मिडियाचा अतिरेक…!

midia
भारतीय लोकशाहीचा चौथा आणि भक्कम असा आधारस्तंभ म्हणून मिडिया म्हणजे प्रसारमाध्यमांना ओळखलं जात.देशाच्या स्वातंत्र्यात वृत्तपत्रांची मोलाची कामगिरी ठरली आहे.२१ व्या शतकात सोशल मिडिया,प्रिंटेड मिडिया आणि electronic मिडिया,अशी तीन प्रकारची साधने उपलब्ध झाली आहेत.त्यात इलेक्ट्रोनिक मिडिया हे अतिशय प्रभावी असे मध्यम मानले जाते. मात्र इथली प्रसार माध्यमे राईचा रेडा करण्यासाठी.घटनेला तिखट मीठ लाऊन अशी काही रंगवतात कि मोठ आभाळच कोसळल्याचा भास जनतेला होत असतो.फालतू गोष्टीच live coverage करायचं आणि लोकांचा वेळ वाया घालवायचा हा ह्यांचा नित्य क्रम.आणि हास्यास्पद बाब म्हणजे ह्यांच्या studio मध्ये चर्चे साठी येणारी मंडळी अगदी नेहमीची आणि ठरलेलीच असते,जसा काही कुठल्याही मुद्द्याचे जागतिक विश्लेषक हीच लोक असतात असा संभ्रम ते निर्माण करतात.देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही काहीही घडू देत,निषेध आणि सारवासारव ह्यांच्याचाकडे असते.कुठलीही चर्चा असू देत तीच तीच मंडळी प्रत्येक chanels वर बघायला मिळते.
मिडियाचा अतिरेक खूप वाढला आहे.त्यात electronic मिडियाची तर गावं तिथे शाखाच झाली आहे,
मान्य आहे मिडिया मुळे आपल्याला घर बसल्या जगाच्या काना कोपर्याची माहिती live बघायला मिळते.मात्र बातम्यांचा अतिरेक हि तर मोठी समस्या दर्शकांसमोर येऊन ठेपली आहे.घडलेल्या घटनांचा आढावा असा काही घेतला जातो कि जणू बातमीदार बातमी तर दाखवतो त्याचंबरोबर निर्णय पण देऊन मोकळा होतो.मग या देशातील न्यायालये कशासाठी आहेत ?असा प्रश्न साहजिकच उभा राहतो.चर्चे दरम्यान निवेदक मान्यवरांना काही बोलूच देत नाही,आपला मुद्दा पूर्ण करू देत नाहीत.मग चर्चा असते तरी कशासाठी?.प्रिंट मिडिया देखील आपली जबाबदारी विसरला आहे असं चित्रण हल्ली रोजची वर्तमानपत्रे वाचतांना दिसते.शब्द्कोड्यांमुळे विकली जाणारी वृत्तपत्रे खरचं आपली नैतिक जबाबदारी पार पडतात का?असा प्रश्न निर्माण होतो.हल्ली संपादकीय लेखात सुद्धा नुसती पोपटपंची वाचायला मिळते,आपण मोठे तत्त्ववेत्ते आहोत अस काहीश्या संपादकांचा भ्रम आहे ,कारण हल्ली वर्तमानपत्रे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाची मुखपत्रे झाली आहेत ,त्यामुळे निर्भीड पत्रकारिता संपत चालली आहे का?असाही सवाल उपस्थित होतो,पेपरातील रंगीत जाहिरातींमुळे मिळणारा पैसा लेखन स्वातंत्र्यावर बंदी आणतो का?अशी अनेक प्रश्ने आहेत जी अनुत्तरीत आहेत.