मुंडे-पवार क्रिकेटच्या मैदानात एकमेकांविरुद्ध…..

      imagesराजकारणाच्या मैदानात एकमेकांविरुद्ध अनेकदा उभे ठाकलेले हाडवैरी गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार आता क्रिकेटच्या मैदानातही एकमेकांविरुद्ध लढत आहेत. मुंबई क्रिकेट असोशिअनच्या होऊ घातलेल्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दोघांमध्ये लढत रंगेल. मुंडेंनी आपला उमेदवारी अर्ज काल ८ ऑक्टोबर रोजी दाखल केला असून शरद पवार शुक्रवारी ११ ऑक्टोबररोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोघांनी लढण्याचा ठाम निश्चय व्यक्त केला असून कुणीही माघार घेण्याची शक्यता तूर्तास तरी नाही.

     पवारांचा पुतण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंच्या घरात फुट पडून त्यांचा पुतण्या धनंजय मुंडेंना गोपीनाथ मुंडेंपासून दूर केले. हघाव मुंडेंच्या चांगलाच वर्मी बसला! त्यामुळेच आधीच राजकीय हाडवैरी असलेल्या मुंडे-पवार यांच्यातील कटुता आणखीनच वाढली. आय.सी.सी., बी.सी.सी.आय. चे अध्यक्षपद भूषविल्यानंतर शरद पवार एम.सी.ए.च्या रिंगणात उतरल्यानंतर मुंडेंना आपल्यावरील राजकीय वाराचा वचपा काढण्याची योग्य वेळ दिसू लागली. म्हणूनच त्यांनी थेट शरद पवारांविरुद्ध अध्यक्षपदासाठी दंड थोपटले. दोघांमधील लढत प्रतिष्ठेची मानली जात असून संपूर्ण महाराष्ट्राचे ह्या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे.

One Comment