मुकाबला मेंदूच्या कॅन्सरचा

BRAIN-CANCERअलीकडे कर्करोगाचा विळखा जखडताना दिसतो आहे. यामध्येही ब्रेन आणि स्पाईन कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. शरीरातील दुसर्‍या अवयवांचा उदा. फुफ्फुस किंवा स्तनाच्या कर्करोगाचा प्रभाव ब्रेन आणि स्पाईनवर पडताना दिसतो. ब्रेन कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेला ग्लाइयोमा म्हणतात. प्राथमिक अवस्थेत ब्रेन कॅन्सर मुलांच्या डोक्याच्या पाठीमागच्या बाजूस आणि प्रौढांच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस जडलेला दिसून येतो. या कर्करोगाच गांभीर्य तो किती पसरला आहे आणि कुठल्या भागात पसरला यावर अवलंबून असतं. याची काही प्राथमिक लक्षणं जाणून घ्यायला हवीत.

*डोकेदुखी आणि मळमळ. बरेचदा रुग्ण अचानक बेशुद्ध पडतो आणि कोमात जातो.

*रुग्णाच्या वागणुकीत फरक जाणवतो. स्मरणशक्ती कमी होते आणि वारंवार आकडी येते. या कर्करोगावर वेळीच उपचार व्हायला हवेत. सर्जरी, रेडिओथेरपी किंवा केमोथेरपीद्वारे यावर प्राथमिक उपचार होतात.