मुगवड्याची भाजी

moong bhaji

साहित्य :-

१)      मुगवड्या दोनशे ग्राम

२)     कांदे दोन-तीन मध्यम

३)     लाल मिरच्या पाच-सहा

४)     टोमाटो दोन मोठे

५)    गरम मसाला पावडर दोन-तीन चमचे

६)      लसूण पाकळ्या पाच-सहा

७)    आलं पाव इंच

८)     कोथिंबीर पाव वाटी

९)      तेल पाव वाटी , फोडणीचं साहित्य .

कृती :-

१)      कांदे बारीक चिरून घ्यावे , टोमाटोही बारीक चिरून घ्यावे .  आलं-लसूण , सुक्या लाल मिरच्यांची पेस्ट करून घ्यावी .

२)     तेलात फोडणी करावी .  त्यामध्ये वाटण परतावं .  नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा , टोमाटो परतावेत .

३)     मिश्रणाला तेल सुटू लागलं की मुगवड्या घालून दोन-तीन मिनिटं परतावं

४)     त्यानंतर भाजीत तीन वाटया पाणी घालून भाजी व्यवस्थित शिजू द्यावी .  भाजी शिजताना त्यात कोथिंबीर घालावी .

५)    थोडी कोथिंबीर भाजी शिजल्यानंतर वरून पेरावी .