मुगाची उसळ (२)

साहित्य :-12345

१)      मूग एक वाटी

२)     कांदे दोन मोठे

३)     हिरव्या मिरच्या चार-पाच

४)     एक लहान लाल टोमाटो

५)    लसूण सात-आठ पाकळ्या

६)      तेल पाव वाटी

७)    फोडणीचं साहित्य

८)     चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      मूग आदल्या दिवशी भिजत घालावेत .  दुसऱ्या दिवशी कुकरला न लावता    वेगळे शिजवावेत . 

२)     अर्धी पळी तेलाची फोडणी करून त्यात मिरची , कांदा , टोमाटो व ठेचलेला   लसूण घालून परतावं . 

३)     त्यात शिजवलेले मूग घालावेत .  (शिजवलेलं पाणी घालू नये .) आणि पाणी    न घालता नुसतीच एक वाफ दयावी .