मुगाची उसळ
|१) मोड आलेले मूग पाव किलो
२) कोथिंबीर पाव वाटी
३) धने-जिऱ्याची पूड दोन चमचे
४) आवडीप्रमाणे लाल तिखट
५) तेल दोन मोठे चमचे
६) फोडणीचं साहित्य
७) चवीपुरतं मीठ व चिमुटभर साखर .
कृती :-
१) मूग आधी कुकरमध्ये शिजवून घ्यावेत . असं करायचं नसेल तर प्रेशर पैनमध्ये तेलाची फोडणी करून त्यात मोडाचे मूग , धने-जिरे पूड , लाल तिखट , मीठ , चवीपुरती साखर , पाव वाटी कोथिंबीर आणि एक वाटी पाणी घालून मंद आचेवर दहा मिनिटं शिजू दयावं .
२) नंतर खाली काढून डिशमध्ये घालताना लिंबाची , टोमाटोची चकती व कोथिंबीरीनं सजवावी .