मुगाच्या डाळीची आमटी
|१) एक वाटी मूग डाळ
२) सात-आठ लसूण पाकळ्या ठेचून
३) लहान भोपळी मिरची चिरून
४) सात-आठ कढीलिंबाची पानं
५) एक-दोन हिरव्या मिरच्या
६) चवीला गूळ
७) दोन-तीन आमसूल
८) फोडणीचं साहित्य
९) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) डाळ तासभर भिजत घालावी . नंतर धुऊन दोन वाटया पाणी घालून कुकरमध्ये न ठेवता तशीच गरगट होणार नाही इतपतच शिजवावी .
२) शिजताना थोडी हळद , हिंग , एक चमचा किसलेलं आलं घालावं . सात-आठ मिनिटात डाळ शिजेल .
फोडणीत मिरच्यांचे तुकडे , कढीलिंब घालावा , ही फोडणी डाळीवर घालून मीठ , गूळ , आमसूलं घालून एक-दोन मिनिटं उकळावी . वरून कोथिंबीर घालावी .