मुन्नार (Munnar)
|मुन्नार
मुन्नारमधील मुट्टीपेट्टी डॅम – केरळ पर्यटन स्थळ
केरळमधील थंड हवेचे ठिकाण म्हणून मुन्नार प्रसिद्ध आहे. मुन्नार डोंगरावर असल्यामुळे या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुम्हाला कमालीची थंडी जाणवेल. या ठिकाणाहून तुम्हाला बाहेर पडावेसे वाटणार नाही.
मुन्नार हे अनेकदा हनिमून डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही छान थंडीचा आनंद घ्या. कारण या ठिकाणी तुम्हाला फिरायला मिळेल. वातावरणाचा आनंद घेता येईल.
पाहण्यासारखी ठिकाणं
मुट्टीपुट्टी डॅम,अन्नामुडी, पोथामेडी व्ह्यू पॉईंट, टी म्युझिअम, काऊबॉय पार्क अशी काही ठिकाणं आहेत.
मुन्नारमध्ये करण्यासारख्या गोष्टी
मुन्नारमध्ये तुम्हाला मुट्टीपुट्टी डॅमकडे छान वेगळे दागिने मिळतील. तिथेच तुम्हाला छान लोकल फूडचा आस्वाद घेता येईल.
