मुबारक ईद मुबारक……

eid
मुबारक ईद मुबारक……
मुस्लीम बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र असलेला रमजान महिना यंदाच्या वर्षी खूप लवकर आला,म्हणजे वसंताच्या पावन चाहुलीत…………
रमजान ईद हा सन सहसा दिवाळीच्या टप्प्यात येतो.म्हणजे ऑक्टो/नोव्हे च्या दरम्यान.मात्र यंदाच्या वर्षी रमजान लवकर आल्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाच आणि चैतन्याचं वातावरण आहे.सुमारे महिनाभर रोजा धरून ईदच्या दिवशी सोडला जातो.हा सन म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच औत्सुक्याचा आणि आनंदाचा असतो.
नवीन खरेदी,मिष्ठान्नाची भडीमार,दुध खीरीचा फराळ,एकत्र येऊन प्रत्येकाला ईदची शुभेच्छा देणे,यासारखी कामे ईदच्या दिवशी होतात प्रत्येकाला म्हणजे आपल्या आपुलकीच्या माणसाला ईदी दिली जाते (भेटवस्तु).
रमजान ईदच्या दिवशी सर्व मुस्लीम बांधव एकत्र जमून सकाळी नमाज पठाण सामुहिक रित्या करतात आणि मग आपल्या सणाची मजा लुटतात.