मुलांची उंची वाढविण्यासाठी..

Person measuring a young girls height against a height chart on the wallमुलांच्या अभ्यास, आरोग्य, आहार अशा अनेक बाबतीत पालक नेहमीच काळजी करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘मुलांची उंची’. प्रत्येक पालकाला वाटते कि इतर बाबींप्रमाणे उंचीतही आपले मुल कमी पडायला नको. त्यासाठी अनेक उपायही करण्याची त्यांची तयारी असते. त्यापैकीच काही महत्वाचे उपाय आम्ही खाली देत आहोत.

१)       उंची वाढविण्यासाठी अस्थिधातू विकसित करणारा आहार-विहार ठेवावा.

२)     खजूर, बदाम, आक्रोडसारखे पदार्थ, शेवग्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगाची भाजी, ताज्या फळांची भाजी, मोड आलेली धान्ये यांचा आहारात समावेश करावा.

३)     बंद डब्यातील पदार्थ, पावाचे विविध प्रकार, रसायनं टाकून केलेले चमचमीत वाटणारे अनेकविध प्रकार, मैद्याच्या पीठाचे प्रकार, अति थंड पदार्थ खाणे टाळावे. चॉकलेट, गोळ्या, गोड पदार्थ यांचाही उंची कमी राहण्यामागे बराच मोठा हात आहे.

४)     दुधात विविध साखरेचे पदार्थ टाकून मुलांना देण्याची सवय कमी करणे आवश्यक आहे.

५)     विविध स्वरूपाचे नियमित केलेले व्यायाम उंची वाढविण्यास मदत करतात. लहान मुलांना योगासनांची सवय लावली तर उंचीसह व्यक्तीमत्वही विकसित होवून निरोगी व तेजस्वी जीवन ते जगू शकतात.

One Comment