मुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष.

childसध्या लहान मुलांमध्ये जाडीचं प्रमाण वाढतयं. लहान वयातील गुटगुटीतपणा जाडीकडे झुकतो आणि पालकांची चिंता वाढते कारण जाडीपोटी अनेक व्याधीही मागे लागतात. म्हणूनच मुलांच्या जाडीकडे वेळीच लक्ष द्यावे. पालक काही खबरदारी घेऊ शकतील.जाडीकडे दुर्लक्ष नको.मुलांचा आहार र्मयादित ठेवा. भूक असेल तेवढेच खायला द्या. खाण्याची जबरदस्ती करणे म्हणजे जाडीला आमंत्रण देण्यासारखे आहे.मुलांच्या खाण्याच्या वेळा नक्की करा. यात अनियमितता असल्यास जाडी वाढते. पुढील गोष्टींकडे लक्ष द्या

१.मुलांना सुरुवातीपासूनच घास चावून चावून खाण्याची सवय लावा.

२.मुलांच्या जाडीची इतरांशी तुलना करू नका. ते यामुळे अस्वस्थ होतील अशा प्रतिक्रिया देऊ नका. 

३.सुरुवातीपासूनच मुलांना व्यायामाची सवय लावा ,त्यांना सायकल वापरायला द्या. 

४.छोटी मोठी कामं चालत जाऊन करण्याची सवय लावा.

५.मुलांच्या खाण्यामध्ये चॉकलेट, बिस्कीट, टॉफी इत्यादीचं प्रमाण र्मयादित ठेवा.