मुलांना शिस्त लावताना..?

punishmentमुलांना शिस्त लावताना ओरडणे, रागावणे आणि मारझोड या गोष्टी क्रमानं येतात. पालकांकडे संयम कमी असल्यास शिस्तीची सुरुवातच मारझोडीनं होते. त्याच्या जोडीला दुषणे देणे आणि शिव्यांचा भडीमार असल्यास परिस्थिती आणखीन बिकट होते. बरेच पालक या उपायानं मुलांना वठणीवर आणण्याचा प्रय▪करतात. मात्र प्रत्यक्षात मारझोड आणि शिवीगाळीमुळे मुलं अधिक आक्रमक होतात. ती अधिकाधिक निगरगट्ट होतात. मारझोड नित्याची झाल्यास त्यातील भीती कमी होते आणि विरोधाची भावना बळावते. अशा परिस्थितीत मार चुकवण्यासाठी मुलं खोटं बोलण्याचा आधार घेतात आणि बुडत्याचा पाय अधिकाधिक खोलात जातो. मारझोडीमुळे मुलांचं बालपण कलुषित होतंच; पण भविष्यातही याचे दुष्परिणाम दिसतात. पालकांप्रती कमालीचा राग, तिटकारा, चीड आदी भावना मनी ठेवून वाढणारा हा जीव प्रौढ अवस्थेत त्यांच्याप्रती कमालीची अनास्था दर्शवतो. म्हणूनच मारझोड टाळायला हवी.