मुलांना स्नेह हवा

parenting1पालक आणि मुलांमधले नातेसंबंध मुलांच्या भविष्यावर परिणाम करत असतात. लहानपणापासूनच मुलांचे योग्य रितीने संगोपन झाले तर त्यांचा सर्वांगाने विकास होतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वांगानं बहरतं. पालकांकडून मिळालेली वागणूक त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकते. लहान असताना मुलं आई-वडिलांच्या मागे मागे करतात. त्यांच्या जवळ जाण्याचा प्रय▪करतात. या कृतीतून ते पालकांचा स्नेह मिळवू इच्छित असतात. पण पालक कठोरपणे दूर करत असल्यास नकळत परिणाम होत असतो. बरेचदा आई-वडिलांना कामावर जाण्याची घाई असते. मुलांच्या मागं मागं करण्यानं कामात व्यत्यय येतोच. त्याचप्रमाणे बाहेर पडते वेळी कपडेही खराब होतात. याच कारणास्तव मुलांना दूर ठेवलं जातं. पण या साध्यासुध्या वाटणार्‍या वागणुकीचाही मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. अशी वागणूक मिळाल्यास मुले भित्री होतात. त्यांना लोकांमध्ये मिसळण्याची आणि बोलण्याची दहशत वाटते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *