मुलांमधील डोकेदुखी
|विविध कारणांमुळे मुलांमध्ये दोखेदुखीची समस्या जाणवते. अपुरी झोप, अभ्यासाचा ताण, चष्म्याचा नंबर, धावपळ यांमुळे वयाच्या साधारणतः १०व्या वर्षांपासून मुलांमध्ये डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. साधारण त्रास म्हणून ह्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करणे मोठी चूक ठरू शकते. मुलांमधील डोकेदुखीचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊन ती कमीदेखील होऊ शकते. अशा प्रकारची डोकेदुखी जाणवणाऱ्या मुलांची खालीलप्रमाणे काळजी घ्यावी,
१) डोकेदुखीच्या गोळ्या (पेनकिलर्स) जास्त प्रमाणात किंवा दररोज घ्यायचे टाळावे.
२) नियमितपणा ठेवावा. झोपण्याची व उठण्याची वेळ शक्यतो नियमित ठेवावी. कमीतकमी 6 ते 7 तास झोपावे.
३) नियमित व्यायाम करावा.
४) मायग्रेनचा त्रास असलेल्या रुग्णांनी शक्यतो चॉकलेट, चीझ, संत्री, कॉफी व कोका-कोलासारखे पदार्थ टाळावेत.
५) शालेय विद्यार्थ्यांनी वर्षातून एकदा डोळे तपासणी करून घ्यावी.