मुळ्याच्या पाल्याची भाजी

green gram

साहित्य :-

१)      मुळ्याचा पाला एक जुडी

२)     हरभऱ्याची डाळ पाव वाटी

३)     लसूण चार पाकळ्या

४)     चवीपुरतं मीठ

५)    आवडीप्रमाणे लाल तिखट

६)      तेल पाव वाटीपेक्षा थोडं जास्त

७)    फोडणीचं साहित्य .

कृती :-

१)      मुळ्याचा पाला धुऊन चिरून घ्यावा .  डाळ दोन तास आधीच गरम पाण्यात भिजवून ठेवावी किंवा आदल्या रात्री भिजत घातली तर उत्तमच .

२)     लसूण ठेचून घ्यावा .  फोडणी करून त्यात लसूण टाकावा .  नंतर त्यात चिरलेला मुळ्याचा पाला घालावा .

३)     नंतर मीठ , तिखट घालावं .  भिजवलेली डाळ त्यात घालून परतून वर झाकण ठेवावं .

४)     हरभरा डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो .  प्रेशर पैनमध्ये ही भाजी एका वाफेवर होते .