मूग डोसा
|
१) एक वाटी अख्खे मूग
२) दोन मोठे चमचे बेसन
३) एक मोठा चमचा लिंबाचा रस
४) एक वाटी कांदा बारीक चिरून
५) एक मोठा चमचा आल्याचे तुकडे
६) एक चमचा हिरव्या मिरचीचे
७) एक चमचा जिरं
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) मूग सात-आठ तास भिजत घालून चाळणीत उपसून घ्यावे . दहा-बारा तासात त्यांना मोड येतील .
२) हे मोड आलेले मूग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे . वाटलेल्या मुगात लिंबाचा रस , बेसन , मीठ , जिरं घालून कालवावं .
३) कांदा , आलं , मिरच्या एकत्र करावं . डोशासाठी करतो तसा तवा तयार झाल्यावर एक मोठा डाव मिश्रण मध्यभागी घालून भराभर गोलाकार पसरावं .
४) वर कांदा-मिरचीचं मिश्रण पसरून कालथ्यानं किंचित दाबावं , कडेनं तेल सोडावं आणि कडा सुटायला लागल्या की , डोसा उलटावा .
५) पुन्हा तेल सोडावं . खालच्या बाजूचा कांदा लालसर व्हायला लागला की , डोसा खाली काढावा . (डोसा सुटत नसला तर झाकण ठेवावं . पीठ पातळ वाटलं तर थोडं तांदळाचं पीठ मिसळावं .) मुगाऐवजी मटकी , चवळी किंवा मिश्र कडधान्यही चालतील .
very good