मेकअप पद्धती

Makeup2लग्नसराईच्या या काळात थीम मॅरेजची चलती आहे. लग्नसोहळय़ाच्या पद्धतीत बदल होत आहेच त्याचप्रमाणे वधूच्या शृंगारातही नवे ट्रेंड्स बघायला मिळत आहेत. सध्या सिलिकॉन मेकअपची क्रेझ आहे. यात मेकअपचा बेस सिलिकॉनचा असतो. हा मेकअप करताना हात अथवा ब्रशचा वापर न करता स्प्रेचा वापर केला जातो. या अनोख्या पद्धतीने केलेला मेकअप आकर्षक आणि बराच काळ टिकणारा आहे. यामध्ये चेहर्‍यावरील सुरकुत्या लपल्या जातात त्याचप्रमाणे फ्रेश लुक मिळतो. सध्या वधूच्या पेहरावातही बदल होत आहे. पारंपरिक साडीऐवजी अन्य स्टायलिश प्रावरणांचा वापर करण्याचा प्रघात वाढत आहे. डोक्यावर कमी पदर आणि पारदर्शक दुपट्टा घेतल्यास एक ट्रेंडी लुक मिळू शकतो. मात्र कुठलाही पेहराव खुलून दिसण्यासाठी शरीरयष्टीही सुडौल असणे गरजेचे आहे. हेअर स्टाईलमुळेही छान लुक मिळू शकतो. मात्र केसांची आकर्षक रचना केल्यानेच तो मिळतो असे नाही. केस चमकदार, सळसळीत आणि आरोग्यसंपन्न असतील तर पाठीवर मोकळे सोडल्यानेही छान स्टाईल साधता येते. सध्या हेवी मेकअपचा ट्रेंड कमी होताना दिसतोय. मात्र डोळ्यांचा मेकअप जास्त स्मोकी असण्याकडे लक्ष पुरवले जात आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *